आठवडे बाजार सुसाट ; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:48+5:302021-06-18T04:12:48+5:30

ग्राहकांनी पाळलेच नाही अंतर : भाजीविक्रेत्यांकडे तुफान गर्दी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहरात बुधवारी पिंप्राळ्याचा बाजार भरतो. ...

Weeks market smooth; No masks, no social distance | आठवडे बाजार सुसाट ; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग

आठवडे बाजार सुसाट ; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग

ग्राहकांनी पाळलेच नाही अंतर : भाजीविक्रेत्यांकडे तुफान गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहरात बुधवारी पिंप्राळ्याचा बाजार भरतो. या बाजाराला काही दिवस आधी बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यावेळीदेखील हा बाजार कोपऱ्यांमध्ये भरतच होत. बुध‌वारी पिंप्राळा आणि अक्सा नगरातील आठ‌वडे बाजार उठवण्यात आला असला तरी गेल्या काही आठवड्यांप्रमाणे निवृत्ती नगरात हा बाजार भरला होता. आणि त्याला गर्दी देखील होती.

बुधवारी शहरातील अक्सा नगर भागात आठवडे बाजार भरतो. त्याला बुध बाजार म्हणून ओळखले जाते. तसेच पिंप्राळा परिसरातही दर बुधवारी बाजार भरविला जातो. बुधवारी या दोन्ही ठिकाणी बाजार भरले होते. मात्र मनपाच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत या दोन्ही ठिकाणचे बाजार उठवण्यात आले. त्यामुळे येथे होणारी गर्दी टळली, असे असले तरी निवृत्ती नगरात भरणारा बाजार भरला होता. तेथे ग्राहकांची तुफान गर्दी झाली होती.

बुध बाजार आणि पिंप्राळ्याच्या आठवडे बाजारात जवळपासच्या तालुक्यांमधून शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत होते. तर संपुर्ण शहरातील नागरिक भाजी, फळे आणि इतर वस्तुंच्या खरेदीसाठी येथे गर्दी करत होते. मात्र कोरोनाच्या काळात आठवडे बाजारांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे विक्रेत्यांनी आपला मोर्चा शहरातील इतर बाजारांंकडे वळवला आहे.

बुधवारचा बाजार

शहरातील अक्सा नगर परिसरात हा बाजार भरणार अशी अपेक्षा नागरिकांना होती. त्यानुसार हॉकर्स देखील आपला माल तेथे घेऊन जाण्याच्या तयारीत होते. मात्र तेथे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी सात वाजेपासूनच कायम ठेवला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झाले होते. बाजार भरेल या अपेक्षेने आलेल्या हॉकर्सला परत जावे लागले.

पिंप्राळा बाजार

गुजराल पेट्रोल पंपांकडून पिंप्राळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून नियमीतपणे हा बाजार भरतो. आता या बाजारात दुपारनंतर काही व्यापारी आपला माल घेऊन दाखल झाले. मात्र या बाजारात देखील मनपाच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दाखल झाले. व्यापाऱ्यांना तेथून उठवण्यात आले. त्यानंतर तेथे बाजार भरला नाही.

निवृत्ती नगर

निवृत्ती नगरात आठवडे बाजार भरत नव्हता. मात्र लॉकडाऊनच्या काळात बाजार भरण्याच्या जागांवर मनपा आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्त लावतात. त्यामुळे हॉकर्स तेथे आपला माल ठेऊ शकत नाही. त्यामुळे निवृत्ती नगरात बाजार भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिकदेखील तेथे खरेदीसाठी जात आहे. त्यासोबतच पिंप्राळा रोड, गणेश कॉलनी चौक, सुभाष चौक या भागात दररोज सायंकाळी बाजार भरतो. त्यात नागरिक विना मास्क आणि विना सोशल डिस्टन्सिंग गर्दी करत असतात.

Web Title: Weeks market smooth; No masks, no social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.