जागतिक शांती प्रस्थापित करायची असेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST2021-05-27T04:17:14+5:302021-05-27T04:17:14+5:30

डॉ. अशोक गायकवाड : बुद्ध जयंतीनिमित्त व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बुद्ध विचार हा ऐकमेव विचार असा आहे, ...

We want to establish world peace | जागतिक शांती प्रस्थापित करायची असेल

जागतिक शांती प्रस्थापित करायची असेल

डॉ. अशोक गायकवाड : बुद्ध जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बुद्ध विचार हा ऐकमेव विचार असा आहे, जो जगाला शांतीकडे घेऊन जावू शकतो. आज जागतिक परिस्थिती लक्षात घेता सर्वत्र अस्थिरता पसरली आहे. अशा अवस्थेत जर जागतिक शांती प्रस्थापित करावयाची असेल तर बुद्ध विचाराशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, असे प्रतिपादन डॉ. अशोक गायकवाड यांनी केले.

फुले–शाहू-आंबेडकर विचारमंच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच अजिंठा हाउसिंग सोसायटी व फुले–शाहू-आंबेडकर उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी प्रज्ञा-शील-करुणातून फुलवून येणारे मानवी जीवन व समाजक्रांती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. म.सू.पगारे होते. प्रास्ताविक डॉ. अनिल चिकाटे यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उगलाल शिंदे यांनी केले तर आभार विक्की साळवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण अवसरमल, डॉ. विजय घोरपडे, दीपक खरात, शांताराम तायडे, सुबोध वाकोडे, बाबूराव वाघ, ताराचंद अहिरे, कृष्णा सदानशिव, महेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: We want to establish world peace