सावता माळी शिक्षण संस्थेसाठी जागा द्यावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST2021-06-28T04:12:13+5:302021-06-28T04:12:13+5:30

या जागेबाबत लवकरच पुराव्यासकट मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील ...

We have to provide space for Savta Mali Education Institute | सावता माळी शिक्षण संस्थेसाठी जागा द्यावीच लागेल

सावता माळी शिक्षण संस्थेसाठी जागा द्यावीच लागेल

या जागेबाबत लवकरच पुराव्यासकट मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ही जागा भाडेतत्त्वावर देण्याचा ठरावही पालिकेत मंजूर झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलातील एक संपूर्ण मजला शाळेसाठी राखीव करावा, अन्यथा शाळेला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी संस्थेने केली होती. परंतु, ही मागणी फेटाळून लावत पालिका प्रशासनाने बांधकाम सुरूच ठेवले आहे. बांधकामाला स्टे मिळू नये म्हणून न्यायालयात आधीच कॅव्हेट करून ठेवली आहे. शिक्षण संस्थेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. न्यायालयासह रस्त्यावरदेखील आम्ही हक्काची लढाई सुरू करू. संस्थेची जागा कुणालाही गिळंकृत करू देण्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. पालिका प्रशासनाने गावातील विद्यार्थांचे हित लक्षात घेता, व्यापारी संकुलातील एक मजला शाळेसाठी राखीव ठेवावा जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारेल. परंतु पालिका प्रशासन प्रेमाने ऐकत नसेल तर आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल, असाही इशारा भाजप ओबीसी आघाडीचे ॲड. संजय महाजन यांनी दिला आहे.

Web Title: We have to provide space for Savta Mali Education Institute