शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सोमवारी सुरळीत होणार पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:15 IST

दुरुस्तीनंतर भरण्यात आल्या पाण्याच्या टाक्या

ठळक मुद्देकुसुंबानकजीक विद्युतरोधक फुटल्याने वीज पुरवठा झाला होता खंडितमनपा व महावितरणच्या अधिका-यांनी केली पाहणी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - शहरात शनिवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघूर रॉ वॉटर, उमाळा जलशुध्दीकरण केंद्र व गिरणा टाकी या तीनही ठिकाणचे विद्युतरोधक फुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता. रविवारी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाण्याच्या टाक्या भरण्यात आल्या. त्यामुळे सोमवारी शहरात वेळेवर पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.मनपा व महावितरणच्या अधिका-यांनी रात्री पाहणी केली असता कुसुंबा गावाजवळील एका ढाब्यानजीक विजेच्या खांबावरील विद्युतरोधक फुटल्याचे दिसून आले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाºयांनी खांबावरील फुटलेले विद्युतरोधक बदलवून वीजपुरवठा सुरु केला. रात्री ८ वाजेपासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने महानगरपालिकेने शहरातील नियोजीत पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला. रविवारी सकाळी वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर वाघूर धरणावरील चारही पंप सुरु करण्यात आले. दरम्यान, सिंधी कॉलनी, गणेशनगर भागात रविवारी पाणी पुरवठा करण्यात आला.आज या भागात होईल पाणीपुरवठाशहरातील नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुने गाव, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी या परिसरात पाणीपुरवठा होईल, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव