भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:29 IST2018-11-27T23:28:28+5:302018-11-27T23:29:38+5:30
वरणगाव शहराचा पाणीपुरवठा मागील आठ दिवसांपासून ठप्प पडल्याने शहरवासीयांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराचा पाणीपुरवठा ठप्प
वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : वरणगाव शहराचा पाणीपुरवठा मागील आठ दिवसांपासून ठप्प पडल्याने शहरवासीयांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
तापी नदीतून कठोरा येथून येणारी मुख्य पाईप लाईन शहराच्या जवळच तीन ठिकाणी फुटल्याने आठ दिवसापासुन पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपालिका प्रशासन चालढकल करीत असल्याचा नागरिक आरोप करीत पालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करीत आहे. मागील आठ दिवसांपासून मुख्य जलवाहिनी खोदून ठेवण्यात आली आहे. जलवाहिनीची जोडणी करण्यासाठी लागणारे साहित्य बाजारात मिळत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.
मुख्य वाहिनीला तीन ठिकाणी गळती लागल्याने तिच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर करण्यात येत आहे. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. - सुनील काळे, नगराध्यक्ष, नगरपालिका, वरणगाव, ता.भुसावळ