शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

मुक्ताईनगर शहरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 1:39 AM

पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.

ठळक मुद्देजॅकवेल उघड्या पडल्याचा परिणामशहराच्या पाणीपुरवठ्याला फटकादोन-तीन दिवसाआड होणार पाणीपुरवठाकूपनलिकांचे पाणीही उतरले

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. काही भागात अपूर्ण पाणीपुरवठा होत असून, संभाव्य टंचाई लक्षात घेता शहरात दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची दवंडी नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.दुसरीकडे संभाव्य टंचाईस तोंड देण्यासाठी दोन विहिरी अधिग्रहित करणयात आल्या आहेत तर शहरात ३४ हातपंप करण्यात येणार असून बुधवारी जळगाव भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे दोन पथक शहरात दाखल झाले आहे. या पथका कडून पाहणी अंती हातपंप करण्या साठी संभाव्य ठिकाणे शोधून दिली जाणार आहे. पथकाने ठरवून दिलेल्या ठिकाणावर हातपंप केले जाणार आहेत.पूर्णा नदीचा विस्तीर्ण जलसाठा असूनही ‘पाणी उशाशी आणि कोरडा घशाशी’ अशी अवस्था शहरात दर वर्षी उन्हाळ्यात असते. गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक दृष्ट्या नियोजनातील अभावामुळे उन्हाळा व पावसाळ्यात शहराला कृत्रिम पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. आजही शहरात पूर्णा नदी सह अन्य ४ ठिकाणच्या विहिरी अशा पाचपेक्षा अधिक उद्भवावरून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काळात तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण पाणीपुरवठा योजना झाली असती तर दरवर्षी येणारे टंचाई संकट टळले असते.दरम्यान, यंदा पूर्णा पत्रातील जलपातळी झपाट्याने खालावली असून, नदी पात्रात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या सर्वच जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. दर वर्षी नदीपात्रात गाळ मोठ्या प्रमाणात वाढत असून विस्तीर्ण पत्रात पाणी उथळ अवस्थेत आले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. अशात हतनूर धरणातून आवर्तन सोडल्याने पाणी पातळी चिंताजनक स्तरावर घसरली आहे. यातून विहिरींचे जलस्तर प्रचंड खालवले असून शेती शिवारासह गावातील विहिरी टप्प्यावर आल्या आहेत. तसेच कूपनलिकांचे पाणीही उतरले आहे. शहरात अनेक खासगी घरगुती कूपनलिका पाणी उतरल्याने बंद पडल्या आहेत.शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपंचायती च्या वतीने करण्यात आहे. नळांना तोट्या बसवियाचे आवाहनही नगरपंचायतीने केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर