बोरी धरण ५१ टक्के भरल्याने पाणी समस्या मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:12+5:302021-07-24T04:12:12+5:30

या धरणाचे पाणलोट क्षेत्र ६३९.८ चौ किमी असून, धरण क्षमता ४०.३१ द. ल. घ. मी. आहे. जलाशयाखालील ८४६ ...

The water problem was solved when the Bori dam was 51 percent full | बोरी धरण ५१ टक्के भरल्याने पाणी समस्या मिटली

बोरी धरण ५१ टक्के भरल्याने पाणी समस्या मिटली

या धरणाचे पाणलोट क्षेत्र ६३९.८ चौ किमी असून, धरण क्षमता ४०.३१ द. ल. घ. मी. आहे. जलाशयाखालील ८४६ हेक्टर क्षेत्र आहे. बोळे तामसवाडी या १६ गावांची व धुळे जिल्ह्यातील २० गावे व पारोळा शहराची पाणी पुरवठा योजना या धरणातून आहे. गेल्या वर्षी १०० टक्के धरण भरले होते. यावर्षी जुलैमध्ये धरणाची पाणी पातळीत वाढ झाल्याचे माहिती स्थापत अभितांत्रिकी व्ही. एम. पाटील यांनी दिली.

तालुक्यात बोरी धरण वगळता सर्वच धरणात अजूनही पाण्याचा ठणठणाट आहे. भोकरबारी,म्हसवे , इंदासी , शिरसमनी , कंकराज , या धरणावर अनेक गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. भोकरबारी १४ टक्के व म्हसवे ८ टक्के पाणी साठा सोडला तर इतर सर्व धरणात शून्य टक्के जलसाठा आहे.

असा आहे पाणीसाठा

बोरी मध्यम प्रकल्प या धरणात २३ जुलै रोजी असलेला जलसाठा २६५.४८ मि. एकूण साठा :-२८.०६ दलघमी.

जिवंत साठा :- १२.९०दलघमी.

मृत साठा :- १५.१६ दलघमी.

टक्केवारी :- ५१.३९ टक्के भोकरबारी - १४.४० टक्के म्हसवा - ८ टक्के शिरसमणी - ०.०० टक्के कंकराज - ०.०० टक्के पिंपळकोठा - ०.००टक्के हे सर्व धरण भरण्यासाठी दमदार पावसाची खूप आवश्यकता आहे. अजूनही अनेक धरणात पाणी साठा नसल्याने त्या-त्या गावांना १० ते १५ दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळ्यात ही पाणी टंचाईचा सामना मात्र करावा लागत आहे.

छाया---तामसवाडी ता. पारोळा बोरी धरणातील जलसाठा ( रावसाहेब भोसले)

Web Title: The water problem was solved when the Bori dam was 51 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.