शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चोरीस गेलेले दागिने मिळाल्याने डोळ्यात आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:31 IST

पोलीस अधीक्षकांच्याहस्ते वितरण : शहर व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील होत्या घटना

जळगाव : शहरातील औद्योगिक पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या़ या घटनांमधील संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला होता़ असा दोन्ही घटनांमधील हस्तगत एकूण १२ लाख ८८ हजारांचा एकूण मुद्देमाल शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशान्वये मूळ फिर्यादींना परत देण्यात आला़ अनेक दिवसानंतर चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादींच्या चेहºयावर आनंद झळकला होता़ पुष्पा शामसुंदर चक्रवर्ती रा़ नवीपेठ, यांच्या घरून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख दोन लाख असा एकूण ८ लाख १० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना १७ जून २०१६ रोजी उघडकीस होती़ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचाºयांनी आबा सोनवणे रा़ गेंदालाल मिल, मनोज कोळी, दत्तू पाटील दोघे रा़विठ्ठलपेठ यांना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ अस्कानगर येथील प्रा़ शेख मोहम्मद इकबाल शेख उस्मान यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ६ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड व बिस्कीट लांबविले होते़ यात पोलीस निरीक्षक सुनील कुºहाडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल व कर्मचाºयांनी रईस खान, इरफान खान, मोहसीन शेख उर्फ दत्ता हमीद शेख या तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता़दोन्ही घटनांमधील फिर्यादींना २३ रोजी जप्त मुद्देमाल परत करण्यात यावा असे न्यायालयाचे आदेश होते़ त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ़जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते फिर्यादींना मुद्देमाल परत करण्यात आला़ डीवाएसपी सचिन सांगळे, पोलीस निरी क्षक सुनील कुराडे, प्रदीप ठाकूर यांचीही उपस्थिती होती़रेल्वे पोलिसांसोबत बैठक  होणारतपास करून फिर्यादींना दागिने मिळवून दिल्याने त्यांचा आनंद एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नाही, असे सुपेकर  यावेळी म्हणाले. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तसेच जिल्हा पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने घरफोडी तसेच चोरीतील आरोपींना पकडण्यास अडचणी निर्माण होतात़ या पार्श्वभूमिवर लवकरच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तसेच शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे डीवाएसपी सचिन सांगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़