शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

अमळनेर तालुक्यातही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 3:53 PM

तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत.

ठळक मुद्देअमळनेरात तीन पुलांची वाहतूक बंद, आपत्ती पथक सज्जसावखेडा, बेटावद , वालखेडा पूल बंदअमळनेर तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन पथक केले रवानाजिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचनासर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. बेटावदजवळील पुलालाही, सावखेडा, मुडी वालखेडा धोका असल्याने चोपडा, शिंदखेडा, शिरपूर, सोनगीर, नंदुरबारकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे.पांझरा नदीतून ५९ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे तर तापी नदीला दीड लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, संततधार पावसाने नालेदेखील वाहू लागले आहेत. यामुळे तापी नदी पाणी स्वीकारणार नाही, बॅकवॉटरमुळे पांझरा काठावरील मांडळ कलंबू, बाम्हणे, भिलाली, मुडी, बोदर्डे, शहापूर, तांदळी आदी गावांना धोका संभवतो. गावात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तहसीलदार देवरे यांनी १२ पथके तयार करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर केली आहे. जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींना गावातच थांबण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तालुक्याची आपत्कालीन समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यात तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बांधकाम विभाग अभियंता, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याचे प्रमुख म्हणून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, तर आपत्कालीन मदत कक्षाचे प्रमुख म्हणून निवासी नायब तहसीलदार बी.डी.धिवरे यांची नियुक्ती केली आहे.अनेक ठिकाणी घरे पडलीपातोंडा, बोडर्डे, लोणसीम, लोण चारम तांडा, वावडे, जळोद , शहापूर, बोहरा या गावांना सुमारे १५ घरे पडली आहेत. घरांना ३२०० ते५२०० तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहेतीन गावांना वेढ्याची शक्यतातापी काठावरील कलाली, बोहरा , सात्री आदी गावांना वेढा पडण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पथक सज्ज ठेवले आहे.तीन पूल बंदतालुक्यातील मुडी वालखेडा पूल वाहून गेल्याने सोनगीर, दोंडाईचा वाहतूक बंद झाली आहे. बेटावद येथील पुलालाही धोका असल्याने त्यावरील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबार वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर तापी नदीवरील सावखेडा पुलालाही धोका आहे. यामुळे चोपडा, यावल, रावेर, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.बैठकीस पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, एपीआय राहुल फुला, अजयकुमार नष्टे, सुनील मोरे, डी.पी.गांगोडे दुय्यम, डॉ.प्रकाश ताडे, डॉ.विलास महाजन, डॉ.भोई, एस.डी.सूर्यवंशी, बी.व्ही. वारे, संजय चौधरी, पी.डी.धनगर, आर.बी.मंडलिक, एस.एम.गवळी, एस.एम.कुलकर्णी, आर.आर.गांगुर्डे, डी.एस. बाविस्कर, हर्षवर्धन मोरे, पी.एस.पाटील, एन.जी.कोचुरे, डी.पी.बोरसे, एस.जी.पंचभाई, सु.श.मुदिराज, बी.सी.अहिरे, धीरज देशमुख, एन.डी.धनराळे, नी.वा.जाधव, एस.आर.भोसले, एस.के.आढाव, आर.जी.गरुड, संजय पाटील, जितू ठाकूर, वाय.व्ही.पगारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरAmalnerअमळनेर