आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.४ - सर्वाधिक धरण असलेल्या आणि राज्याच्या जलसंपदा विभागाची धुरा सांभाळणाºया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यावर जलसंकट गडद झाले आहे. सद्यस्थितीला ६८ गावांमध्ये टंचाई सदृष्यस्थिती आहे. ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १३ गावांमधील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात भीषण पाणीटंचाईराज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि जलसंपदा सारखे महत्त्वाचे खाते सांभाळणाºया गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात जानेवारी महिन्यापासून नागरिकांना पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीला समोरे जावे लागत आहे.११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठायंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जामनेर तालुक्यात टंचाईची स्थिती जून महिन्यापासून कायम आहे. पावसाळ्यात सुध्दा ४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. सध्या मोहाडी, खर्चाने, रोटवद, सार्वे प्र.लो., लाखोली, मोरगाव, पळासखेडे प्र.न., वाघारी, तिघ्रे वडगाव, शंकरपुरा व सारगाव या ११ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.१३ गावातील विहिरींचे अधिग्रहणसद्यस्थितीला जामनेर तालुक्यातील काळखेडे, कोदोली, नांद्रा प्र.लो, मोहाडी, रोटवद, सार्वे प्र.लो, लाखोली, मोरगाव, वाघारी, पळासखेडे प्र.न., तिघ्रे वडगाव , पाळधी, शंकरपुरा या गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.६८ गावांवर पाणीटंचाईचे सावटदरम्यान, पंचायत समितीने तयार केलेल्या संभाव्य कृती आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च याकालावधीत ६८ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचण्याची शक्यता आहे. यातील ३५ गावातून टँकरची मागणी होऊ शकते. ही स्थिती लक्षात घेवून प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी प्रयत्न केले जात आहेत.टँकरवर दररोज २४ हजार खर्चएका टँकरसाठी दररोज सरासरी ३ हजार खर्च होत आहे. सध्या आठ टँकर सुरु असल्याने दररोज २४ हजार रुपये खर्च होत आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरच्या दररोज काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी ४ ते ५ फेºया केल्या जात आहेत.
जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात भीषण जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 19:39 IST
६८ गावांवर टंचाईचे सावट, ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा तर १४ गावामधील विहिरींचे अधिग्रहण
जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात भीषण जलसंकट
ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात भीषण पाणीटंचाईजामनेर तालुक्यात ६८ गावांवर पाणीटंचाईचे सावटजामनेर तालुक्यातील १३ गावातील विहिरींचे अधिग्रहण