पहूर, ता.जामनेर : दीड कि.मी. अंतरावरील औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग जवळ असलेल्या अशोक बारी यांच्या शेतात कन्नड तालुक्यातील चापानेर तांडा येथील रहिवासी नवनाथ नारायण चव्हाण (३५) याने स्वत : च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची ह्रदयदायक घटना गुरुवारी रात्री सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे.यात तो गंभीर भाजला असून त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.औरंगाबाद महामार्गाला लागून अशोक बारी यांचे शेत असून त्याठिकाणी झोपडी होती. यात मध्ये घुसून नवनाथ नारायण चव्हाण याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत : ला पेटवून घेतले. झोपडीसह शेतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे, किरण गायकवाड अनिल देवरे यांनी धाव घेतली.युवकाच्या मदतीने घटना उघडकीसअशोक बारी यांच्या शेतात झोपडी पेटत असल्याचे एका सोनवणे नामक युवकाला दिसले. याची माहिती गावात देण्यात आली. घटनास्थळी युवकांनी धाव घेऊन झोपडीवर पाणी टाकण्यासाठी सुरवात करताच पेटलेला माणूस अचानक खाली पडला. हे पाहून युवक भेदरले व त्यांनी पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली.
पहूरजवळ युवकाने स्वत:ला पेट्रोल टाकून पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:59 IST
औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग जवळ असलेल्या अशोक बारी यांच्या शेतात कन्नड तालुक्यातील चापानेर तांडा येथील रहिवासी नवनाथ नारायण चव्हाण (३५) याने स्वत : च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची ह्रदयदायक घटना गुरुवारी रात्री सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे.
पहूरजवळ युवकाने स्वत:ला पेट्रोल टाकून पेटविले
ठळक मुद्देजळीत युवक कन्नड तालुक्यातील चापानेर तांडा येथीलमद्यप्राशन करीत पेटविले स्वत:लाकर्जबाजारीपणातून असलेल्या तणावातून केला प्रयत्न