शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णाड तपासणी नाक्यावर कडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 14:56 IST

राज्याची सीमा : पायी जाणारे परप्रांतीय अनेक मजूर पडले अडकून

मुक्ताईनगर : पूर्णाड सीमा तपासणी नाक्यावर कोरोना संसर्गाच्या पर्शवभूमीवर राज्यसीमा बंद करण्यात आली आहे. एकही नागरिक मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येऊ नये तसेच परप्रांतीय मजुरांना सीमेवरच रोखण्यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेने कंबर कसली आहे. परप्रांतात पलायन करणाऱ्या मजुरांची काळजी म्हणून आरोग्य विभाग देखील रस्त्यावर उतरले आहे. सीमा तपासणी नाक्यावर रुग्ण तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जीवनावश्यक वस्तूच्या मालवाहू वाहनांच्या माध्यमातून ठीकठिकाणी अडकलेले नागरिक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेश व इतरराज्यात पलायन करीत आहेत. नागरिकांच्या या पलायन साखळीला तोडून कोरोना संसर्गाच्या संभावित धोक्याला रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झाल्या पासून येथे तपासणी नाके सुरू झाले आहे. परंतु नागरिक वेगवेळ्या शक्कल लढवून सीमा ओलांडत आहेत. त्यामुळ्य आता सीमेवर हा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला असून दिवस- रात्र २४ तास खडा पहारा सुरू करण्यात आला आहे.दोन विशेष पथकेपोलीस बंदोबस्तात जळगाव मुख्यलायचे दोन पथक असून तालुक्यातील चिखली आणि पूर्णाड सीमा तपासणी नाक्यावर नेमणूक करण्यात आले आहे. एक पोलीस उप निरीक्षक आणि ४ कर्मचाऱ्यांचे या प्रमाणे हे एक पथक आहे. महसूल विभागातर्फे तलाठी व मंडळ अधिकारी यांची देखील नेमणूक आहे.येणाºया जाणाºयांचीकसून चौकशीकोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यसीमा बंद केल्या असुन मध्य प्रदेशत जाणाला बºहाणपूर रस्त्यावरील आरटीओ जवळ चेक पोस्ट वर येणाºया - जाणाºयांची कसुन चौकशी सुरु आहे. यामुळे आपापल्या गावी पायी जाणारे मजुरांचे टोळके रस्त्यावरच सिमेनजिक अडकुन पडले आहेत. शेजारील बुलढाणा जिल्ह्यात कापसाच्या जिनींगवर कामाले गेलेले तसेच इतर ठिकाणी अडकलेले मजूर पायी घराकडे निघाले आहेत. लहान मुलांबाळांचाही समावेश या मजुरवर्गात आहे. रस्त्याने चालतांना गावांगावांतुन पीठ,तांदुळ खाण्यासाठी मिळत होते मात्र आता ते रस्त्यातच अडकुन पडले आहेत.गेल्या महिन्या भरात अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या मार्गाने सीमा ओलांडली आहे. दक्षता म्हणून आता सीमा बंदी कठोर करण्यात आली आहे. जीवनावश्यक व तातडीची वाहतूक करणाºया वाहनांचीही कसून तपासणी सुरू आहे.२४ तास आरोग्यतपासणी सुरुआरोग्य विभागाने एक क्लीनिक तपासणी नाक्यावर उघडले असून २४ तास तपासणी सुरू आहे. एक वैद्यकीय अधिकारी आणि ३ कर्मचाºयांचे हे पथक सीमे वरून राहदरी करणाºया अत्यावश्यक वाहनांच्या चालकांची तसेच सीमेवर थोपविण्यात येणाºया परप्रांतीय नागरिकांची तपासणी करीत आहे.