The wall of the house collapsed at Sakali in Yawal taluka | यावल तालुक्यातील साकळी येथे घराची भिंत कोसळली
यावल तालुक्यातील साकळी येथे घराची भिंत कोसळली

ठळक मुद्देवृद्ध महिला जखमी भरदुपारची घटना

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : साकळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगराच्या समोरील भागातील एका घराची भिंत कोसळून मोगाबाई समरद सुरवाडे ही ६५ वर्षीय वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली़ ही घटना १३ रोजी दुपारी घडली. जखमी महिलेवर जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ही घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी लहान मुलेही खेळत होती. मात्र या मुलांचे दैव बलवत्तर होते म्हणून घटना घडण्यापूर्वीच ही मुलं बाजूला खेळायला निघून गेलेली होती.

Web Title: The wall of the house collapsed at Sakali in Yawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.