जळगाव-मुंबई विमानसेवेला आठवडाभराची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:42 IST2018-03-29T13:42:52+5:302018-03-29T13:42:52+5:30
नाराजी

जळगाव-मुंबई विमानसेवेला आठवडाभराची प्रतीक्षा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - काही दिवसांपासून बंद असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी आणखी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जळगाव-पुणे सेवा देखील याच दरम्यान सुरु होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. दरम्यान विमानसेवा खंडीत होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असून नियमीत सेवेची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत २६ डिसेंबरपासून जळगाव ते मुंबई या विमानसेवेला प्रारंभ झाला आहे. आठवड्यातून तीन वेळा विमान फेऱ्यांची सुविधा देण्यात आली आहे. २४ मार्चपासून कंपनीतर्फे सलग चार दिवस तिकिट बुकींग बंद करून सेवा बंद करण्यात आली होती. सध्या विमान फे-यांचे शेड्युल्ड प्राप्त झालेले नसल्याने बुकींग थांबविण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे जळगाव-मुंबई सेवा तात्पुरती बंद केली आहे. आगामी आठवडाभरात ही सेवा सुरु करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच जळगाव-पुणे या मार्गावरील विमान सेवेचे वेळापत्रक देखील प्राप्त होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.