जामनेरला शिवरायांच्या पुतळ््याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:41 IST2019-02-19T22:41:10+5:302019-02-19T22:41:32+5:30

जामनेर : नगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील चौकात महापुरुषांचे पुतळे व व्यापारी संकुलांना त्यांची नावे देण्याचे आश्वासन केव्हा पूर्ण होईल याची ...

Waiting for Jamnar statue of Shiva | जामनेरला शिवरायांच्या पुतळ््याची प्रतीक्षा

जामनेरला शिवरायांच्या पुतळ््याची प्रतीक्षा

जामनेर : नगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील चौकात महापुरुषांचे पुतळे व व्यापारी संकुलांना त्यांची नावे देण्याचे आश्वासन केव्हा पूर्ण होईल याची प्रतीक्षा नागरीकांना लागली आहे. पालिका कार्यालयासमोरील चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी शिवजयंती निमित्त करण्यात आली.
पालिका निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी चौकात शिवरायांचा भव्य पुतळा उभारणीचे आश्वासन दिले होते. तसेच विविध व्यापारी संकुलांना महापुरुषांची नावे दिली जातील असेही सांगितले होते.
सद्य स्थितीत पालिका कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे अर्धाकृती पुतळे आहेत. शहरातील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने पालिका कार्यालयासमोरील मोकळ््या जागेत शिवरायांचा पुतळा उभारणे शक्य असल्याने त्यादृष्टीने विचार करुन पुतळा उभारणीबाबत पालिकेने कार्यवाही करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

Web Title: Waiting for Jamnar statue of Shiva

टॅग्स :Jalgaonजळगाव