जळगाव जिल्ह्यातील रेशन गोदामांच्या अहवालाबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:46 IST2018-02-01T12:46:48+5:302018-02-01T12:46:54+5:30

अनियमितता आली होती आढळून

'Wait and watch' about the reports of ration warehouses | जळगाव जिल्ह्यातील रेशन गोदामांच्या अहवालाबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’

जळगाव जिल्ह्यातील रेशन गोदामांच्या अहवालाबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - जिल्ह्यातील रेशनच्या गोदामांची तपासणी केल्यानंतर पथकाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे अहवाल दिल्यानंतर यात काय आहे, हे अद्यापही समजू शकलेले नसून त्याबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’च असल्याचे चित्र आहे. 
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथे रेशनच्या गोदामांची अचानक पाहणी केल्यानंतर तेथे अनियमितता आढळून आली होती. या संदर्भात खडसे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री  गिरीश बापट यांच्याकडे तक्रार  केली होती.  या तक्रारीनुसार मुंबई येथील 12 जणांचे पथक जिल्ह्यात आले होते.  या  पथकाने जिल्ह्यातील गोदामांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान काही गोदामातील दप्तरही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गेल्या गुरुवारी  जिल्हाधिका:यांना अहवाल सादर केला होता.   
यामध्ये जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांची  तपासणी राहिली होती. त्यासाठी  धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर येथील जिल्हा पुरवठा अधिका:यांमार्फत वरील तालुक्यातील गोदामांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी या अधिका-यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे सादर केला.   
या दोनही अहवालाबाबत बुधवारी विचारले असता अहवाल पाहिला जात असल्याचे  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले. 

Web Title: 'Wait and watch' about the reports of ration warehouses