शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

वहीवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:08 IST

वहीवाट हा शब्द अनेक अर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध संदर्भांनी वापरला जातो. याच ‘वहीवाटे’विषयी खास शैलीत लिहिताहेत तावडी बोली भाषेचे अभ्यासक डॉ.अशोक कौतिक कोळी.

वहीवाट हा ग्रामीण भागातला परवलीचा शब्द होता़ अनेक अर्थानी हा शब्द महत्त्वाचा होता़ अर्थाच्या अनेक छटा आणि कंगोरे त्याला व्हते़ व्यवहारात अनेक वेळा त्याचा वापर व्हायचा. केवळ वापरच नाही तर बखेडे सोडविण्याकामीही त्याचा वापर व्हायचा़ अशावेळी अनेकवेळा हा शब्द कानावर यायचा़ आमुक आमुकची तशानं तशी वहीवाट आहे़ पूर्वापार चालत आलेली ही वहीवाट रोखू नका़ वहीवाट या शब्दाला पूर्वापार, फार जुनी ही खास विशेषणे होती़ त्याचे कारणही तसे व्हते़पूर्वापार म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली़ फार जुनी. जिचा वापर वाडवडिलांनी केलेला आहे, जिला त्या सर्वांची मान्यता आहे़ म्हणजेच वहीवाट तिला अर्थातच समाजमान्यता व्हती़ सर्वांची सहमती व्हती़ अशा समूह भावनेवर तर गावगाडा चालून व्हता़ ग्रामव्यवस्था टिकून व्हती़समूह भावनेत एकमेकाचा आदर, एकमेकाला समजून घेणे फार महत्त्वाचे व्हते़ आणि होतेही तसेच एकमेकाला समजून घेण्यात ग्रामीण माणूस अग्रेसर होता़ सामंजस्य त्याला देणगी स्वरूपात मिळालेले असायचे़ अर्थात परंपरेने अशा अनेक गोष्टी व्हत्या, ज्या त्याला वारसा म्हणून मिळालेल्या व्हत्या़ ज्या त्याला सांभाळाव्या लागत व्हत्या़ तशा तर ह्या प्रथा-परंपरा त्याला आभूषणांसारख्या मिरवाव्या वाटत व्हत्या़ होत्याही तशाच त्या अर्थपूर्ण, परिपूर्ण, समंजस्य़काही प्रथा-परंपरांना तर कायदासदृश्य दर्जा प्राप्त झालेला राहात व्हता़ जगण्याची रीत बनून जात व्हत्या त्या. नियमांचा दर्जा प्राप्त होऊन जात व्हता त्यांना. त्यांचे पालन सहज होऊन जात व्हते़ अंतरिक उर्मीतून हे सारे घडत व्हते़ सगळ्यांनाच त्या हव्याहव्याशा वाटत व्हत्या़ सगळ्यांकडूनच त्या पाळल्या जात व्हत्या़ प्रसंगी काही तंटा-बखेडा उद्भवल्यास समाजाकडूनच त्यांचे संरक्षण केल्या जात व्हते़ न्यायनिवाडा केला जात व्हता़कशानं काय व्हत्या बरं- अशा परंपरा, ज्यांना वहीवाटींचा दर्जा प्राप्त झालेला व्हता? तर त्या अनेक प्रकारच्या व्हत्या़ वैयक्तिक काही सामाजिक सुद्धा. वैयक्तिक म्हणसाल तर लेकबायचा आदर राखणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा व्हती़ मुलगी, महिला, माय, बहीण यांचा आदर राखला जात व्हता़ मुलीच्या जन्माचे कौतुक केले जात व्हते़ जन्मोत्सव साजरा केला जात व्हता कन्याजन्माचा. आदराने वाढवल्या जात व्हते तिला. कोनत्याही प्रकारे दुखावल्या जात नव्हते़ कपड्यालत्यांची, दागदागिन्यांची हौस पुरवल्या जात व्हती़ साक्षात लक्ष्मीचे रूप, देवीचा अवतार म्हणूनच महिलांकडे पाहिले जात व्हते़ त्याच आदराने वाढवल्या जात व्हते़लग्न झाल्यावरही महिलांचा आदर कायम राखला जात व्हता़ सासरी गेल्यावरही माहेरातील त्यांची वहिवाट कायम राखली जात व्हती़ अबादीत ठिवल्या जात व्हती़ त्याचे स्वरूप आदराचे व्हते, कौतुकाचे व्हते़ माहेरी आलेल्या माहेरवाशीणीचे कौतुक सगळ्यांनाच असायचे. सगळेच तिचा मानसन्मान राखायचे़ विशेष करून सणासुदीला, आनंदाच्या क्षणाला, मंगल कार्याला त्यांची उपस्थिती माहेरात असायची़ माहेरचा पाहुणचार, माहेरचं कौतुक आणि साडीचोळी ह्यावर तिचा हक्क असायचा़ परंपरेने तशानं तशी वहीवाटच बनून गेलेली. भाऊबीजेचा सण आला म्हणजे भाऊ निघाला बहिणीला आनायला. अशानं आसं व्हतं! हीच वहीवाट पुढे प्रशस्त होऊन जायची़ नात्यांची वीण घट्ट करत जायची. माय-बहिणींचा सगळयांनाच लळा लागायचा़ मुलाबाळांना लळा लागायचा़ त्यांच्या मनात, आदर, माय, ममता उत्पन्न व्हायची़ मामाच्या घराची ओढ लागायची़ सणासुदीला मामाचा गाव जवळ केला जायचा़ सुट्यांची धमालही तिकडेच व्हायची़ मामाचा गाव आपला वाटायचा़ गावभर आपुलकीने स्वागत व्हायचे़ शिवारही आपलसं वाटायच़ं शिवारातला रानमेवाही आपला वाटायचा़ सर्वांवर प्रेमाचा हक्क असायचा. तसा तो प्रस्तापितच होऊन जायचा. एकमेकांच्या खोड्या काढणे, थट्टा करणे, रानावणात फिरणे, मौजमजा करणे हे सारं ओघाने यायचं़ त्याची सवय होऊन जायची़ मामाच्या गावाला जायची वहीवाट पडून जायची़ मामांना भाच्यांची ओढ लागायची़ आपुलकीने पाहुणचार व्हायचा़ कपडेलत्ते घेतले जायचे. सोबत धान्य वगैरे वानोळ्याचे सामानही मिळायचे़ हे सारं सहज- हक्काने होऊन जायचे़ वहीवाटच असायची़ही वहीवाट नंतर नात्यात रूपांतरित व्हायची़ मामाची मुलगी बायको केली जायची़ त्यातून नात्यांचा विस्तार व्हायचा़ वहीवाट एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यत चालू राहायची़ हा प्रकार फक्त मामा, बहीण यांच्यापुरता मर्यादित असायचा, आसं नव्हतं बरं का! तर आत्या, फूई, माम्या, मावशा यांच्याही बाबतीत लागू असायचा़ त्यांचीही आपल्या भावाकडे, भाच्याकडे, मामाकडे, मावसाकडे, बाबाकडे, आजोबांकडे वहीवाट असायची़... (पूर्वार्ध)-डॉ.अशोक कौतिक कोळी, जामनेर

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर