गिरणा धरणापाठोपाठ वाघूर धरणही १०० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:32 IST2019-09-22T12:31:50+5:302019-09-22T12:32:47+5:30
दिलासा

गिरणा धरणापाठोपाठ वाघूर धरणही १०० टक्के भरले
जळगाव : जळगाव तालुक्यासह भुसावळ, जामनेर तालुक्याची तहान भागविणारे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. गिरणा धरणापाठोपाठ वाघूर धरणही १०० टक्के भरल्याने दिलासा मिळाला आहे.
वाघूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून वाघूर नदी दुथडी भरुन वाहत आहे. मराठवाड्यातून येऊन जळगावातील धरणाला हे पाणी येऊन मिळाल्याने धरण फुल्ल झाले आहे.