वाघडू शाळेला पुराचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:28+5:302021-09-07T04:20:28+5:30
वाघडूसह परिसरातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत असलेल्या या शाळेला अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसला आहे. प्रत्येक वर्गात ...

वाघडू शाळेला पुराचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान
वाघडूसह परिसरातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत असलेल्या या शाळेला अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसला आहे. प्रत्येक वर्गात पाणी शिरल्यामुळे टेबल, खुर्च्या, बेंचेस व फर्निचरचे नुकसान झाले आहे. विज्ञान प्रात्यक्षिक व रासायनिक साहित्याच्या कपाटात पाणी गेल्याने यातील सर्व साहित्य, कागदपत्रे पाण्याने भिजून खराब झाली आहेत.
संगणक केबिनमध्येही पाणी शिरल्याने संगणक व त्यातील इतर साहित्य तसेच शालेय दप्तर, पुस्तके, वह्या, फाईल तसेच शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शाळेच्या सर्व वर्गात गाळ व पाणी साचले आहे. महसूल विभागाने या नुकसानीचा पंचनामा केला आहे. अतिवृष्टीमुळे शाळा इमारतीचा स्लॅब गळण्यास सुरुवात झाली आहे. या पुराच्या तडाख्याने शाळेचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक शांतीलाल पाटील व त्यांचे सहकारी सतीश पाटील यांनी दिली.
060921\06jal_10_06092021_12.jpg
वाघडू शाळेला पुराचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान