वाघ नगरात गटारीच्या सांडपाण्यावरून दाम्पत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST2021-03-21T04:15:24+5:302021-03-21T04:15:24+5:30

जळगाव : गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या कारणावरून दाम्पत्याला चौघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ...

In Wagh Nagar, a couple was beaten by sewage | वाघ नगरात गटारीच्या सांडपाण्यावरून दाम्पत्याला मारहाण

वाघ नगरात गटारीच्या सांडपाण्यावरून दाम्पत्याला मारहाण

जळगाव : गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या कारणावरून दाम्पत्याला चौघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता वाघ नगरातील जिजाऊ नगरात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे शशिकलाबाई पुंजू बाविस्कर, पुंजू नथ्थू बाविस्कर, सावित्रीबाई पुंजू बाविस्कर आणि संतोष पुंजू बाविस्कर (सर्व रा.जिजाऊ नगर) यांनी राजू बाविस्कर यांना लाकडी दांडक्याने कमरेवर मारून हाड फॅक्चर केले. तसेच राजू बाविस्कर यांच्या पत्नीलादेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी राजू बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजय भालेराव करीत आहे.

Web Title: In Wagh Nagar, a couple was beaten by sewage