मतदार यादीत नाव सापडत नसल्याने मतदारंची फिराफीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:27 IST2018-08-01T13:18:23+5:302018-08-01T13:27:07+5:30
मतदारांना माघारी परतावे लागले

मतदार यादीत नाव सापडत नसल्याने मतदारंची फिराफीर
जळगाव : जळगाव मनपा निवडणुकीसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक मतदारांना त्यांचे नाव यादीत न सापडल्याने त्यांना फिराफीर करावी लागली. अनेकांचे छायाचित्र नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले.
खेडी रस्त्यावरील शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रातील प्रभाग क्रमांक ४ च्या तीन क्रमांकाच्या बुथवर नाव असलेल्या मतदाराकडे त्यांच्या नावाची मतदार चिठ्ठीदेखील होती, मात्र त्यांचे नाव यादीत सापडत नव्हते. त्यामुळे त्या मतदारांना माघारी परतावे लागले.
खेडी परिसरातील काही मतदार केंद्रांवर पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.