लसीकरणात पडणार पुन्हा खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:51+5:302021-07-01T04:13:51+5:30
कोविशिल्डचे फक्त ४५० डोस उपलब्ध, कोव्हॅक्सिनचे सहा हजार डोस उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसापासून ...

लसीकरणात पडणार पुन्हा खंड
कोविशिल्डचे फक्त ४५० डोस उपलब्ध, कोव्हॅक्सिनचे सहा हजार डोस उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना लसींचे डोस उपलब्ध होते. मात्र मंगळवारी आणि बुधवारी नवीन डोस न आल्याने बुधवारी सायंकाळी आरोग्य यंत्रणेकडे कोविशिल्डचे फक्त ४५० डोस शिल्लक आहेत. मात्र कोव्हॅक्सिन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कोव्हॅक्सिनचे ६,२१० डोस प्रशासनाकडे उपलब्ध आहेत.
सध्या जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध असली तरी, प्रथम प्राधान्य हे ४५ वर्षांवरील नागरिकांना दिले जात आहे. त्यातही बुधवारी जिल्ह्यात कोविशिल्डचे फक्त ४५० डोस आहेत. तर बुधवारी किंवा गुरुवारी नव्याने कोरोना लसीचे डोस मिळणार नाही. त्याबाबत अजून माहिती मिळालेली नसल्याचे आरोग्य यंत्रणेतर्फे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात १९५७ नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात बुधवारी १ हजार ९५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातील ८०२ जणांनी जळगाव शहरात लस घेतली. पहिला डोस १३१६ जणांनी घेतला तर, ६४१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये २११ जणांनी पहिला तर, १३० जणांनी दुसरा डोस घेतला.