स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरुगोविंदसिह, वीर सावरकर, छत्रपती संभाजी महाराज, चंद्रशेखर, कणाद, चरक, सुश्रुत, नागार्जुन, आर्यभट्ट, रामानूज भास्कराचार्य संघ सहभागी झाले होते. सर्व सामने अत्यंत चुरशीचे व रंगतदार झाले.
अंतिम सामना भास्कराचार्य इंटलिजन्स विरुद्ध चरक सुपर किंग संघादरम्यान झाला. अंतिम तिन मिनीटात जो संघ अधिक गुण प्राप्त करेल , तो विजेता ठरणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार चरक सुपर किंग संघाने ६ विरुध्द ३ अधिक गुण प्राप्त केले. या सामन्यात पंकज पावरा, किरण पावरा, मुकेश भिलाला, नीलेश बारेला, रुपेश खैरनार, दिनेश भिलाला, राम बारेला, मुकेश बारेला, संजय बारेला, नितीन कोळी, दिलीप बारेला, पियुष चौधरी आदींनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. सामन्याचे आयोजक संतोष वाळसे व सुनिल वाघ यांनी केले. पंच म्हणुन सुनिल वाघ, दीपक पाटील, रुपेश खैरनार, विपुल खाचणे, निरंजन पाटील, यश पाटील, आशिष पावरा, नितीन कोळी, प्रणव पिसाळ व तन्मय कोल्हे यांनी काम पाहिले.