शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

विठ्ठल भजावा, आलो देवाजीच्या गावा.. : जळगावची मुक्ताबाई राम पालखी पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:53 AM

भाविकांचा अपूर्व उत्साह

जळगाव : सावळ््या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या शेकडो वारकरी, भाविकांसह जळगावातील संत मुक्ताबाई राम पालखी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला गुरुवार, ११ जुलै रोजी पंढरपुरात पोहचली. चार जिल्हे व १२ तालुक्यांमधून प्रवास करताना अभंग, भजनांच्या मधूर निनादामध्ये २४ दिवसात ही पालखी पंढरपुरात दाखल झाली.जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा अर्थात जळगाव ते पंढरपूर वारीचे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी १७ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते.सर्वात पुढे संत मुक्ताबाई राम पालखीजळगाव येथून निघाल्यावर पालखी शिरसोली, वावडदा, दुसखेडे, लोहटार, कजगाव, रांजणगाव मंडवाडी, चापानेर, बोरगाव, खुलताबाद, तुर्काबाद, प्रवरासंगम, नेवासा, वडाळा, जेऊर, नगर, रुईछत्तीसी, मिरजगाव, करमाळा, मांगी, वांगी, टेंभुर्णी, करकंब, पवारवस्ती या मार्गाने २४ दिवस प्रवास करुन ही पालखी ११ जुलै रोजी दुपारी दोन वाजता चंद्रभागा नदीच्या पुलावर पोहचली. वाखरी येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या विविध पालख्या एकत्र येतात. या सोहळ्यात मुक्ताबाईची पालखीदेखील सहभागी झाली. विशेष म्हणजे सर्वात पुढे मुक्ताबाईची पालखी होती. त्या मागे संत नामदेव महाराज व इतर पालख्या विठूरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाल्या.संध्याकाळी मठात दाखलदुपारी पुलावरून चंद्रभागेचे पात्र नजरेस पडताच वारकरी सुखावले व त्यानंतर ओढ लागली ती सावळ््या विठूरायाच्या दर्शनाची. चंद्रभागेचे पात्र ओलांडत श्री विठ्ठल, ज्ञानोबा, तुकाराम व मुक्ताबाईंच्या नामस्मरणात श्री क्षेत्र पंढरपूर येथे संध्याकाळी पालखीने प्रवेश केला. तेथे कासार घाटावरील श्री संत नामदेव मंदिराजवळ जळगावकर महाराजांचा वाडा येथे संध्याकाळी सात वाजता पालखी पोहचली.....लागलीसे आससंध्याकाळी मठात पालखी पोहचल्यानंतर दिंडीतील सर्वानाच आस लागली विठू माऊलीच्या भेटीची. सर्वांनी चंद्रभागेसह तिच्या तिरी उभा असलेल्या विठूरायाच्या मंदिराचे मनोहारी दृष्य आपल्या डोळ््यात साठवून घेत दर्शनासाठी मार्गस्थ झाले आणि आषाढी एकादशीची पहाट कधी येते आणि लाडक्या विठूरायाचे कधी दर्शन होते, अशीच सर्वांना आस लागली.पाच दिवस मुक्कामया ठिकाणी आता ५ दिवस मुक्कामास राहणार असून या ५ दिवसात दररोज चंद्रभागेचे स्नान, पंढरपूर नगर प्रदक्षिणा, श्री विठ्ठल दर्शन, भजन, भारुड, प्रवचन, कीर्तन, हरीजागर, श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी, श्री सद्गुरु मामासाहेब दांडेकर पुण्यतिथी, गोपाळकाला यासारख्ये अनेक कार्यक्रम होणार आहे.केवळ जळगावातूनच रामरायाची मूर्तीआषाढी वारीसाठी पंढरपूरला राज्यभरातून येणाºया विविध दिंड्यांपैकी केवळ जळगावातून जाणाºया वारीत रामरायाची मूर्ती असते. तसेच संत मुक्ताबाईची सर्वात जुनी पालखी जळगावातीलच आहे, हे विशेष.पावसासह भक्तीरसात वारकरी चिंबअप्पा महाराजांचे वंशज व विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, श्रीराम महाराज जोशी यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्यामध्ये रोज काकडा भजन, श्री संत मुक्ताईंच्या पादुका व श्रीराम मूर्तीचे पूजन, भजन, भारुड, प्रवचन, कीर्तन, श्रीराम रक्षा स्त्रोत पठण, हरिपाठ, सामुदायिक जप असे कार्यक्रम झाले. दररोज होणाºया पावसासह पालखीतील या भक्तीरसातही वारकरी चिंब होत असे.पालखी सोहळ््यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्यावतीने औषधी देण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे व इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दिलेल्या या औषधांचा वारकºयांना मोठा लाभ झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव