पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:05 IST2019-09-01T00:04:36+5:302019-09-01T00:05:52+5:30
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे शनिवारी सायंकाळी बिबट्या आढळून आला आहे.

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे बिबट्याचे दर्शन
खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथे शनिवारी सायंकाळी बिबट्या आढळून आला आहे. सारोळा खुर्द येथील संदीप पाटील हे पाचोऱ्याकडे आपल्या चारचाकीने जात असताना त्यांच्या गाडीसमोर अचानक बिबट्या आल्याने घाबरून गाडी थांबवली व बिबट्या आपल्या गावाजवळ असल्याचे गावात कळवले. गावकरी येत नाही तोपर्यंत शेजारी शेतात बिबट्या पसार झाला. बिबट्याचे दर्शन झाल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित या बिबट्यांचा बंदोबस्त करून त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.