भुसावळ येथे रेलसिटी प्रांतपालांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 16:14 IST2019-11-10T16:13:56+5:302019-11-10T16:14:36+5:30

रेलसिटीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीला भेट दिली.

Visit of Railcity Governor at Bhusawal | भुसावळ येथे रेलसिटी प्रांतपालांची भेट

भुसावळ येथे रेलसिटी प्रांतपालांची भेट

ठळक मुद्देसदस्यांच्या कामाचे केले कौतुकपुढील उपक्रमांसाठी दिली दिशा

भुसावळ, जि.जळगाव : रेलसिटीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीला भेट दिली. गेल्या चार महिन्यांतील क्लबचे कार्य पाहून त्यांनी सदस्यांचे कौतुक केले. पुढील आठ महिन्यांचे नियोजन, विविध प्रकल्प याविषयीचे मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीने हातात घेतलेल्या सर्व समाजोयोगी कार्यक्रमांचे व नियोजित प्रकल्पांचे प्रांतपाल भामरे यांनी कौतुक केले. बैठकीत प्रास्ताविक भाषणामध्ये अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी प्रांतपालांची प्रशंसा केली व पुढील ८ महिन्याचे करावयाचे नियोजन सादर केले.
हरविंदर ठेठी यांनी मुसाळतांडा येथील लिटररी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. डॉ.मकरंद चांदवडकर, विशाल ठोके, देवा वाणी व सोनू मांडे यांनी गतकाळातील प्रकल्पांचा आढावा व आगामी प्रकल्पांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास उपप्रांतपाल अनिल अग्रवाल, उपप्रांतपाल चेतन पाटील, आमदार संजय सावकारे यांची उपस्थिती होती. रेल सिटीचे सचिव मनोज सोनार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Visit of Railcity Governor at Bhusawal