जैनाचार्य विजय रश्मिरत्नसूरिजी यांची जैन हिल्सला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:40+5:302021-02-13T04:17:40+5:30

जळगाव - जैनत्व जागरण अभियान अंतर्गत श्वेतांबर मूर्तिपूजक जैन समाजातील तपागच्छ सूरि प्रेमभुवनभानु समुदायामधील इंडिया बुक रेकॉर्ड - एशिया ...

Visit of Jainacharya Vijay Rashmiratnasuriji to Jain Hills | जैनाचार्य विजय रश्मिरत्नसूरिजी यांची जैन हिल्सला भेट

जैनाचार्य विजय रश्मिरत्नसूरिजी यांची जैन हिल्सला भेट

googlenewsNext

जळगाव - जैनत्व जागरण अभियान अंतर्गत श्वेतांबर मूर्तिपूजक जैन समाजातील तपागच्छ सूरि प्रेमभुवनभानु समुदायामधील इंडिया बुक रेकॉर्ड - एशिया बुक रेकॉर्ड धारक विश्वविक्रमी ४५१ दीक्षादानेश्वरी श्री गुणरत्न सूरीश्वरजी म.सा. यांचे शिष्यरत्न जैनाचार्य विजय रश्मिरत्नसूरिजी यांचे गुरुवारी जैन हिल्स येथे आगमन झाले. जैन उद्योगसमूहातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी जैन हिल्स येथील शेती संशोधन व प्रात्यक्षिक केंद्र, गांधी तीर्थ, श्रद्धाधाम येथे भेट देऊन भाविकांशी संवाद साधला. यावेळी जैन परिवारातील सदस्यांनी जैन साधू गणांचे दर्शन घेतले.

“द ॲड्रेस ऑफ रियल हॅप्पीनेस” या विषयावर जैनाचार्य विजय रश्मिरत्न सूरीश्वरजी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, सुख हे साधन मध्ये नाही, तर साधना मध्ये आहे. सुख हे सामग्रीमध्ये नाही, तर ते आपल्या मनात आहे. सुख भोगात नाही तर सुख त्यागात आहे. सुखाचा खरा पत्ता मिळविण्यासाठी जैनाचार्यांनी दोन मंत्र दिले, पहिला असा की 'मुझे कुछ नही चाहिये' आणि दुसरा 'मेरा कोई दुश्मन नही.' हे मंत्र दररोज १०८ वेळा याचा जाप करा, आपणास सुखाचा अनुभव येईल. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता ते पाचोऱ्याकडे रवाना झाले.

फोटो १३ सीटीआर १९

Web Title: Visit of Jainacharya Vijay Rashmiratnasuriji to Jain Hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.