शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमावलीचे उल्लंघन; खासदार, आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 19:42 IST

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणा कार्यक्रमानंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस परवानगीपेक्षा जास्त जनसमुदाय जमा केला,

ठळक मुद्देपोलिस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.

जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. या प्रकरणी भाजपचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह चार ते पाच हजारांच्या जमावांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण बुधवारी चाळीसगाव येथे झाले. 

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणा कार्यक्रमानंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस परवानगीपेक्षा जास्त जनसमुदाय जमा केला. अटी -शर्तीचा भंग केला व सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नाही, म्हणून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील,  राजेंद्र चौधरी,  संजय रतनसिंग पाटील, संजय भास्कर पाटील, नितीन पाटील, शेख चिरागउद्दीन रफिक उद्दोन शेख, चंद्रकांत तायडे, फकिराबेन मिर्झा, कैलास पाटील यांच्यासह चार ते पाच हजाराच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पोलिस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत. 

टॅग्स :Member of parliamentखासदारCrime Newsगुन्हेगारीMLAआमदारChalisgaonचाळीसगावcorona virusकोरोना वायरस बातम्या