राज्याच्या लोककलावंत निवड समितीवर विनोद ढगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:18+5:302021-08-19T04:22:18+5:30
जळगाव - राज्याच्या लोककलावंत निवडी समितीवर सदस्य म्हणून नुकतीच जळगावातील कलावंत विनोद ढगे यांची निवड करण्यात आली आहे. कोविडच्या ...

राज्याच्या लोककलावंत निवड समितीवर विनोद ढगे
जळगाव - राज्याच्या लोककलावंत निवडी समितीवर सदस्य म्हणून नुकतीच जळगावातील कलावंत विनोद ढगे यांची निवड करण्यात आली आहे.
कोविडच्या महामारीत कलेवर पोट असणाऱ्या व कलेशिवाय उदरनिर्वाहचे कुठलेच साधन नसलेल्या लोककलावंतांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे. त्या अनुषंगाने लोककलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यस्तरावर लोककलावंत निवड समितीची स्थापना केली आहे. यात राज्यभरातून लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ व लोककलावंतांचा या समितीत समावेश असून समितीवर जळगावचे खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची सदस्यपदी निवड केली आहे.
पाच हजार रुपयांची मदत
जळगावसह धुळे, नंदूरबार, नाशिक, नगर या जिल्ह्यातील लोककलावंताची निवड व पडताळणी करून शासनाच्या मदतीपासून लोककलावंत वंचित राहणार नाही याची दक्षता समितीद्वारे घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील कलावंतांच्या संख्येनुसार प्रत्येक कलावंताला पाच हजार रुपयांची कोविड जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे