पारोळा तालुक्यातील आडगाव तलावासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या उपस्थितीत घेतली अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 20:23 IST2018-12-05T20:22:22+5:302018-12-05T20:23:32+5:30
पारोळा तालुक्यातील आडगाव येथील रखडलेल्या पाझर तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी बुधवारी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची आडगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निधी मंजूर करून देण्यासाठी पत्र दिले.

पारोळा तालुक्यातील आडगाव तलावासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या उपस्थितीत घेतली अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील आडगाव येथील रखडलेल्या पाझर तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी बुधवारी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची आडगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निधी मंजूर करून देण्यासाठी पत्र दिले.
३ रोजी आडगाव, गडगाव, तरवाडे, सावरखेडे या गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यलयासमोर बेमुदत उपोषण केले होते. या वेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी ५० टक्के रखडलेल्या या पाझर तलावाचे काम पूर्ण होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन आमदार डॉ .सतीश पाटील यांच्या मध्यस्थीने दिले होते आणि आमदार डॉ.पाटील यांच्यासमवेत या उपोषणकर्त्यांना बोलावले होते. हे काम मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी या उपोषणकर्र्त्यांसमवेत अपर जिल्हाधिकारी अधिकार गोरक्षनाथ गाडीलकर, नियोजन समितीचे अधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली आणि नियोजन समितीतून ३२ लाख ५० हजारांचा निधी यासाठी मंजूर करण्यात यावा, असे सांगितले.
या वेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नाईक, उपअभियंता गायकवाड व आडगाव गावातील माजी सरपंच दीपक नगराज मोरे, नंदा दामू निकम, डी.आर.शेलार, संदीप मोरे, ललित शर्मा, अनिल शेलार, नाना पंडित पाटील, सचिन पाटील, भूषण मोरे उपस्थित होते.