शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सात्रीचे ग्रामस्थ अजूनही सोसताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:59 IST

पाण्याचा जोर वाढलेलाच : शेकडो वर्षांसून करतात हा जीवघेणा प्रवास

अमळनेर : ऐतिहासिक प्रगणे डांगरीच्या नदीपलीकडील सात्री गाव दरवर्षी पावसाळ्यात उपजीविकेसाठी शेकडो वर्षांपासून जीवघेणा प्रवास करीत आहे. पुनर्वसित गाव म्हणून शासनाने एकीकडे विकास थांबवला आहे तर दुसरीकडे पुनर्वसन प्रक्रिया देखील १० वर्षांपासून लांबली आहे. शासनाने प्रतिबंधक धरण क्षेत्र जाहीर करून नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई केली, तर जीवन जगण्यासाठी मात्र पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र ‘लोकमत’ने घटनास्थळी भेट दिल्यानंतर उघडकीस आले.२५ रोजी सकाळी ‘लोकमत’ने सात्री येथे भेट देण्याचा प्रयत्न केला असता बोरी नदीच्या पुरामुळे या गावाला पोहचताच आले नाही. डांगरी या गावात थांबूनच परिस्थिती बघता आली. येथे येण्यासाठी दुसरा पयार्यी रस्ता कलाली निंभोरा गावाकडून आहे. मात्र तिथेही तापी व चिखली, बोरी नदीचे खोरे असल्याने नाल्यातून पावसाळ्यात चालणे अशक्य आहे.गावातील काही दूध उत्पादक अमळनेर व इतर खेड्यांवर दूध आणण्यासाठी आणि राजेंद्र ठाकरे नावाचा आजारी ग्रामस्थला दवाखाण्यात नेण्यासाठी एका खाटेवर मोठा ट्यूूब आणि प्लॅस्टिक कॅन बांधून ती पाण्यातून आणत असताना गावातील चार जण नजरेस पडले. तर अजय भिल नावाचा शेतमजूर हा डांगरी शिवारातील शेती मशागत करण्यासाठी वखर, दुशेर आणि बैलांचे साहित्य नदी पात्रातून पोहत आणताना दिसला. एक एक साहित्य आणि बैलांना नदी पार करून आणण्यासाठी अजयने चार फेऱ्या केल्या. अनेकदा ग्रामस्थांना डांगरी गावातच कपडे कोणाकडे तरी ठेवून पोहत घरी जावे लागते. मनोहर बोरसे या दूध विक्रेत्याने सांगितले की, पावसाळ्यात डांगरी माध्यमिक शाळेत जाणा-या मुलांना आता किती दिवस शाळाबाह्य राहावे लागेल याची शाश्वती नाही. प्राथमिक शिक्षक देखील गावात येऊ शकत नसल्याने मुलांचे शिक्षण रामभरोसेच आहे. गावात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांना जास्त पूर असल्यास तीन-तीन दिवस वाट बघावी लागते. दैनंदिन उपजीविकेसाठीचे अन्न धान्य संपले की उसनवारी करून काम धकवावे लागते, अशी व्यथा त्यांनी मांडली. अवघ्या शंभर मीटरवर असलेले डांगरी गाव त्या काळातील प्रगणे वसूल करणारे मुख्य गाव होते. तर क्रांतिकारक उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील, माजी मंत्री शिवाजीराव पाटील, अभिनेत्री स्मिता पाटील यांचे हे गाव. मात्र त्या काळापासून सात्री हे शेजारील गाव सुविधांपासून वंचित आहे.डांगरी आणि सात्री गावांमधील नदीचे क्षेत्र हे पाडळसरे धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात येते. दोन्ही गावे पूर्ण बुडीत क्षेत्रात असल्याने शासनाने हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केला. तसेच धरण परिसरात पाण्यात उतरण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई आहे. तसा फलक डांगरी गावाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. येथूनच सात्रीला जावे लागते. त्यामुळे पाण्यात उतरून पोहण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नाही.बोरी नदीच्या सततच्या पुरामुळे रेशनचे धान्य सात्रीपर्यंत पोहचवता येत नाही. जिल्हा पुरवठा अधिका?्याशी चर्चा करून धान्य डांगरीपर्यंत पोहचविले जाईल. तेथून काहीतरी व्यवस्था करून सात्रीपर्यंत धान्य ग्राहकांपर्यंत पोहचविले जाईल.-मिलिंद वाघ, तहसीलदार, अमळनेर९ सप्टेंबरपासून गावातील १७ ते १८ घरे पडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे सात्री गावाला पंचनाम्यासाठी पोहचता येत नाही. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.- वाल्मिक पाटील, तलाठीहा खडतर प्रवास रोजचाच...खाटेवरून एखाद्या रुग्णाला अथवा व्यक्तीला आणण्यासाठी खाट डोक्यावर धरून नदीकाठच्या चिखल-काटे असलेल्या खोºयातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला १ किमी अंतर जावे लागते. नंतर चार जण प्रवाहाच्या दिशेने पोहत पलीकडच्या तीरावर खाट पोहचवितात. परत पलीकडे खाट डोक्यावर धरून पुन्हा तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने कापून गावात परतावे लागते. अनवाणी जावे लागत असल्याने पायाला सरपटणारे प्राणी, घातक कीटक चावा घेण्याची भीती असते.