सावखेडा ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:38+5:302021-09-09T04:21:38+5:30
सावखेडा, ता. रावेर : रावेर तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मंगळवारी ग्रामसभा झाली. या ...

सावखेडा ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडला समस्यांचा पाढा
सावखेडा, ता. रावेर : रावेर तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मंगळवारी ग्रामसभा झाली. या ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्यांनी दांडी मारल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
त्यामध्येे १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२२-२३चा कृती आराखडा तयार करणे व आयत्यावेळच्या विषयांमध्ये ग्रामस्थांनी गावात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. यासाठी गावात धूर फवारणी करणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करणे, बेघर वस्तीतील अतिक्रमित लोकांना जागा मिळवून देणे, धनगर वाड्यात गटाराचे बांधकाम करणे, बसस्थानक उभारणे, गावठाण वस्तीतील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करणे, सावखेडा - लोहारा रस्त्याचे ४ किलोमीटर डांबरीकरण करणे, गावठाण वस्तीतील बेघर रस्ता काॅंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव पाठवणे, सिंगल फेज डीपी असूनही सकाळी चार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंतचे लोडशेडिंग बंद करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवणे, अशा समस्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडल्या. गावठाण वस्तीमधील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना बोलावून मार्ग काढला जाईल, असे ग्रामसेवक आर. जी. चौधरी व सरपंच लताबाई पाटील यांनी सांगितले. परंतु, गावठाण वस्तीमध्ये साचलेल्या पाण्याचा विषय हा ग्रामपंचायत स्तरावरच सोडवावा, अशी मागणी गावठाण वस्तीतील ग्रामस्थांनी लावून धरली.
यावेळी ग्रामसेवक आर. जी. चौधरी, सरपंच लताबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुभान तडवी, मनीषा पाटील, छाया पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ग्रामसभेत ग्रामसेवक आर. जी. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच लताबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
(फोटो - योगेश सैतवाल, सावखेडा)
फोटो