गळफास घेऊन खेडीच्या लाईनमनची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:10+5:302021-07-02T04:13:10+5:30
भुसावळ : तालुक्यातील खेडी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात कार्यरत ४१ वर्षीय लाईनमन प्रवीण दगडू सोनवणे (वय ४१, ...

गळफास घेऊन खेडीच्या लाईनमनची आत्महत्या
भुसावळ : तालुक्यातील खेडी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात कार्यरत ४१ वर्षीय लाईनमन प्रवीण दगडू सोनवणे (वय ४१, रा. एएसबी क्वॉर्टर बिल्डींग, नं. १,रूम नं. ४, खडका) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बाजारपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण दगडू सोनवणे यांनी शहरानजीकच्या बियाणी मिलिटरी स्कूलच्या मागील वांजोळा मिरगव्हाण शिवारात रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत बाजारपेठ पोलिसात वांजोळा पोलीस पाटील संतोष भिका कोळी यांनी माहिती दिली. त्यावरून नोंद करण्यात आली आहे. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाजक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.