लासगाव शिवारात गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 22:46 IST2020-10-02T22:32:18+5:302020-10-02T22:46:19+5:30
लासगाव शिवारात गावठी हातभट्टीचा दारूअड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

लासगाव शिवारात गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
ठळक मुद्दे४३५० किमतीचे रसायन जागेवर नष्ट आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पाचोरा : तालुक्यातील लासगाव शिवारात गावठी हातभट्टीचा दारूअड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
लासगाव शिवारातील खैऱ्या नाल्याच्या काठावर केटीवेअरजवळ अचानक धाड टाकली. त्यात अनिल दामू भिल हा भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारू पाडताना आढळला. या कारवाईत १७०० रुपये किमतीचे उकळते गुलमिश्रित रसायन असा एकूण ४३५० रुपयांचा माल आढळला. पोलिसांनी सॅम्पल घेऊन जागेवरच नष्ट केला. आरोपी अनिल भिल यास ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील, राहुल बेहरे, सचिन पाटील, नीलेश गायकवाड व सुनील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.