विधानसभा निवडणूक : जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मुलाखतीसाठी ईच्छुकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:09 IST2019-07-24T13:08:45+5:302019-07-24T13:09:20+5:30
११ जागांसाठी इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती

विधानसभा निवडणूक : जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मुलाखतीसाठी ईच्छुकांची गर्दी
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी कॉंग्रेस तयारीला लागली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांसाठी इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती बुधवारी दुपारपासून सुरु झाल्या आहेत. याासाठी पक्ष कार्यालयात प्रचंड गर्दी झाली आहे.
यासाठी पक्षाचे जिल्हा प्रभारी आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, निरीक्षक रंगनाथ काळे, निरीक्षक करण खलाटे, (बारामती) यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक आदींच्या उपस्थितीत मुलाखती होत आहेत.
जिल्ह्यासाठी इच्छुकांचे ४७ अजर पक्षाकडे आले आहेत.