Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:11 AM2021-09-21T09:11:18+5:302021-09-21T09:22:17+5:30

नगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती, तसेच येथील रस्त्याही नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे, सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही

Video: Building collapses like an address bungalow in Jalgaon, video goes viral | Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल

Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल

Next
ठळक मुद्देनगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती, तसेच येथील रस्त्याही नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे, सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही.

जळगाव - जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील व्ही.पी. रोडवरील ३ मजली इमारत सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पत्त्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली. इमारत कोसळतानाची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इमारत कोसळत असताना काही नागरिक इमारतीसमोर दिसून येत आहेत. 

शहरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. यात शहरातील व्ही. पी. रोडवरील सरकारी गोडावून समोरील  जुनी तीन मजली इमारत कोसळली. इमारत पडक्या स्थितीत असल्याने नगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती, तसेच येथील रस्ताही नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे, सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही. केवळ १८ सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यानंतर, परिसरात धूळकणााचं साम्राज्य दिसून आलं. याबाबत माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत या इमारत कोसळल्याचीच चर्चा गावात रंगली होती. दरम्यान, इमारत कोसळण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read in English

Web Title: Video: Building collapses like an address bungalow in Jalgaon, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.