बहिणीची छेड काढल्यानेच केला विक्कीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 16:52 IST2017-09-07T16:44:13+5:302017-09-07T16:52:40+5:30

भुसावळातील खून प्रकरणानंतर आरोपीने योगसिद्धी मंदिराजवळ लपविले होते हत्यार

Vicky murdered by his sister | बहिणीची छेड काढल्यानेच केला विक्कीचा खून

बहिणीची छेड काढल्यानेच केला विक्कीचा खून

ठळक मुद्देबहिणीची छेड का काढली या वादातून खून केल्याची कबुली आरोपीला ११ सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडीखूनात वापरलेले हत्यार व चाकू केला जप्त

आॅनलाईन लोकमत भुसावळ,दि.७ - : बहिणीची छेड काढल्याच्या संतापातून न्यू. एरिया वॉर्डातील विक्की उर्फ ललित हरी मराठे या युवकाचा त्याचा मित्र व आरोपी राजेंद्र सावकारे याने खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून बाजारपेठ पोलिसांनी खूनात वापरलेले हत्यार व चाकू जप्त केला आहे. मराठे याचा प्रेम प्रकरणातून आरोपी सावकारे यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ चाकूने छातीत वार करून निर्घृण खून केल्याची घटना ५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. पूर्ववैमनस्य व माझ्या बहिणीची छेड का काढली या वादातून हा खून केल्याची कबुली त्याने दिली. घटनेनंतर त्याच रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केली. ६ रोजी न्यायालयात हजर केले असता आरोपीला ११ सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास अधिकारी चंद्रकांत सरोदे यांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार श्रीराम नगरातील श्री योगसिद्धी हनुमान मंदिराच्या मागील बाजूस गटारी जवळून आरोपी सावकारे याने काढून दिले.

Web Title: Vicky murdered by his sister