डीबीटी योजना सुरू झाली तर फारच सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:01+5:302021-07-14T04:20:01+5:30
शेवटच्या विद्यार्थ्यांचे अकाऊंट निघत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. भविष्यात डीबीटी योजना सुरू झाल्यास फारच सुकर होणार ...

डीबीटी योजना सुरू झाली तर फारच सुकर
शेवटच्या विद्यार्थ्यांचे अकाऊंट निघत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. भविष्यात डीबीटी योजना सुरू झाल्यास फारच सुकर होणार असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी व्यक्त केले.
चोपडा येथे कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात खासगी प्राथमिक, जिल्हा परिषद प्राथमिक-माध्यमिक मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी बोलत होत्या. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी व शालेय पोषण अधीक्षक सुधाकर गजरे, केंद्रप्रमुख दीपक पाटील, मुख्याध्यापक संघ माजी अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष एल. पी. चौधरी, मुख्याध्यापक एच. बी. मोरे, एल. एच. अहिरे आदी होते. सुरुवातीला माजी आमदार डॉ. सुरेश पाटील, माजी शिक्षण मंत्री शरद चंद्रिका पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
बैठकीत डॉ. भोसले म्हणाल्या की, ज्या बँकेत त्याच दिवशी बँक खाते काढून मिळत नसेल तर लागलीच शिक्षण विभागास कळवा. कोरोना कालावधीत काही विद्यार्थ्यांपर्यंत अध्ययन, अध्यापन प्रक्रिया पोहोचलेली नाही, यासाठी हा सेतू अभ्यासक्रम सुरू आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरू करताना सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, पालक यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा ठराव करावा, पालकांची संमती घ्यावी. पालक नकार देत असतील तर कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू करायच्या नाहीत. काही मुख्याध्यापक बैठकीस अनुपस्थित होते त्यांना नोटीसा पाठवा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक आर. आर. शिंदे, नरेंद्र भावे, विलास पाटील, सुनील चौधरी, व्ही. आर. पाटील, व्ही. पी. कोष्टी आदी उपस्थित होते. संचलन व्ही. पी. पाटील यांनी केले तर आभार एस. एल. पाटील यांनी मानले.