बांधकामादरम्यान भिंत कोसळल्याने वाहने दबली
By Admin | Updated: May 20, 2017 17:44 IST2017-05-20T17:44:24+5:302017-05-20T17:44:24+5:30
कुंपन भिंत कोसळ्याने भिंतींच्या बाजूला उभ्या दुचाकींचे नुकसान झाले.

बांधकामादरम्यान भिंत कोसळल्याने वाहने दबली
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 20 - जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील मकरा अपार्टमेंटनजीक बांधकाम सुरू असताना कुंपन भिंत कोसळ्याने भिंतींच्या बाजूला उभ्या दुचाकींचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी 11़30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मकरा पार्क शेजारी मोकळ्या जागेत तीन महिन्यांपासून फ्लॅटचे बांधकाम सुरू आह़े याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होत़े या मातीचे मुळे जागेसभोवतालची जीर्ण कुंपन भिंत अचानक कोसळली़ या भिंतीजवळ येथील रहिवासी शेख रज्जाक शेख गुलाब यांनी सावलीसाठी स्कूटर (एम़एच़19़ टी़ 6528) लावली होती़ तसेच पप्पू सुव्रे यांनीही त्यांची सायकल लावली होती़ भिंत कोसळून स्कूटरचे व सायकलचे नुकसान झाले. याचठिकाणी शेख रज्जाक हे त्यांची रिक्षाही लावतात मात्र नेमकी शनिवारी रिक्षा दुसरीकडे लावली असल्याने सुदैवाने तिचे नुकसान टळले. घटनेनंतर शेख रज्जाक व सुव्रे यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे स्कूटर तसेच सायकलची भरपाईची मागणी केली. बांधकाम व्यावसायिकाने नुकसाई भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचे रहिवाशांनी सांगितल़े