मुक्ताईनगरात दुर्गोत्सवानिमित् विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:58 IST2019-10-06T18:57:45+5:302019-10-06T18:58:46+5:30
हिंदवी स्वराज्य दुर्गा मित्र मंडळातर्फे दुर्गोत्सवानिमित्त दररोज विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

मुक्ताईनगरात दुर्गोत्सवानिमित् विविध स्पर्धा
मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील हिंदवी स्वराज्य दुर्गा मित्र मंडळातर्फे दुर्गोत्सवानिमित्त दररोज विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जात असून, ग्रामस्थ या स्पर्धांचा आनंद घेत आहेत.
या मंडळासमोर दररोज लहान मुलांच्या विविध स्पर्धा ज्यामध्ये लिंबू चमचा, संगीत खुर्ची, गीतगायन तसेच महिलांसाठी स्पर्धा व पुरुषांसाठीही स्पर्धा घेण्यात येत आहेत.
यासाठी मंडळाचे अध्यक्ष आकाश सापधरे व उपाध्यक्ष अनिकेत शुरपाटणे यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजनात पुढाकार घेतला आहे. विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या ठिकाणी दररोज मान्यवर भेट देत असतात