बालमहोत्सवात विविध कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:39 IST2019-02-02T17:31:51+5:302019-02-02T17:39:34+5:30

गुणगौरव सोहळा

 Various art disciplines at the Balam Festival | बालमहोत्सवात विविध कलाविष्कार

बालमहोत्सवात विविध कलाविष्कार

पाचोरा : येथील सुपडू भादू पाटील प्राथमिक विद्यालयात बालमहोत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हॉइस चेअरमन व्ही. टी.जोशी होते .
बालमहोत्सवात चिमुकल्यानी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर केले. यात नाटिका, गाणे, फॅन्सी ड्रेस, नक्कल, पोवाडे, विविध कलानृत्य देशभक्तीपर गीते, समाजप्रबोधनात्मक पथनाट्य एकांकिका, वादविवाद आदी कार्यक्रम करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या व बालमहोत्सवात उत्कृष्ट कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती चेअरमन जगदीश सोनार, दगाजी वाघ, संचालक सतीश चौधरी, पालक उपस्थित होते.

Web Title:  Various art disciplines at the Balam Festival

टॅग्स :Jalgaonजळगाव