वरणगावात कार्यकर्त्याने स्वखर्चाने टाकला मुरूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST2021-08-22T04:20:15+5:302021-08-22T04:20:15+5:30
वरणगाव, ता. भुसावळ : दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झिमझिम पावसामुळे प्रभाग क्रमांक नऊ शिवाजीनगरमधील रस्त्यावर ...

वरणगावात कार्यकर्त्याने स्वखर्चाने टाकला मुरूम
वरणगाव, ता. भुसावळ : दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झिमझिम पावसामुळे प्रभाग क्रमांक नऊ शिवाजीनगरमधील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यावर समाजसेवक महेश सोनवणे यांनी स्वखर्चाने मुरूम टाकला. यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
या रस्त्यावरून नागरिकांना चालणेदेखील दुरापास्त झाले होते. बरेच नागरिक दुचाकी घसरून चिखलाने माखले होते. स्थानिक पालिका प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करूनसुद्धा त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे महेश सोनवणे यांनी पदरमोड करून स्वखर्चाने या ठिकाणी पाच डंपर मुरूम टाकला. त्यामुळे सध्या तरी लोकांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा मिळाला आहे. स्थानिक रहिवासी लक्ष्मण भालेराव, संजय पाटील, गणेश इंगळे, भैया मस्के, उल्हास पाटील, चित्ते, मीराबाई कोळी, भास्कर काळे, विशाल चौधरी, आशिष शेजुळे यांनी त्यांचे आभार मानले.