शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यकलेचे मूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:09 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात नाट्यकर्मी डॉ.हेमंत कुुलकर्णी लिहिताहेत...

मूल्य या शब्दाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. मूल्य ज्याला इंग्रजीत व्हॅल्यू असे म्हणतात. जगातील प्रत्येक गोष्ट ही मूल्याधिष्ठित आहे. मग ती वस्तू असो की माणूस प्रत्येकाला स्वत:चे असे मूल्य आहे. मूल्य हे केवळ पैशाने किंवा आकड्यात मोजले जाते असे नाही. समाजकारण, राजकारण, साहित्य, कला, विचार या आणि अशा अनेक क्षेत्रात मूल्य ही त्याची उंची ठरवते. याच मूल्यावर त्या कलाकृतीचा दर्जा ठरवला जातो. कलेच्या प्रांतात मूल्य ही संकल्पना वेगवेगळी ठरते.एखाद्या शिल्पकृतीचे मूल्य तिच्या निर्मिती कौशल्यावरून, तिच्या सुबकतेवरून ठरते. तर एखादे नृत्य हे त्याच्या ताल, लय, अदा, हालचालीतले सौंदर्य इत्यादी परिणामांवरून ठरते.नाट्यकलेचे मूल्य हे दोन प्रकारे जोखता येते. एक म्हणजे त्या नाटकाचे साहित्यमूल्य व दुसरे म्हणजे सादरीकरणाचे मूल्य. या दोन्ही मूल्यावर नाटकाची पारख करता येते. तुलनात्मक मूल्य तिच्या अर्थपूर्णतेवर किंवा तिच्या गेय्यतेवर ठरते. एखाद्या चित्राचे मूल्य हे त्यातल्या रंग, रेषा, आकार यावरून ठरते. फार काय तर ते चित्र बाजारात विकावयास आले तर त्याचे मूल्य हे रुपयात मोजले जाते. नाटक ही प्रथम साहित्यकृती आहे. नाटक हे साहित्य म्हणून जसे वाचनीय आहे तसेच ते रंगमंचावर दृश्य स्वरुपात बघणे अनिवार्य आहे आणि म्हणूनच त्याला दोन प्रकारची मूल्ये आहेत.कोणत्याही साहित्याची जी काही मूल्ये असतात ती सगळी नाटकास लागू आहे. नाटकाची भाषा, विचार, सौंदर्य, मांडणी, समकालिनता, जातकुळी हे सारेच नाटकाचे साहित्य मूल्य ठरवत असते. केवळ साहित्य मूल्य उच्च आहेत म्हणून ते नाटक श्रेष्ठ ठरत नाही तर त्याच्यासोबत त्या नाटकात सादरीकरणाचे मूल्य अपेक्षित आहे तरच ते नाटक म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. नाटककराने जे काही शब्द कागदावर उतरवले आहेत त्याला प्रत्यक्ष जिवंत रूप देण्याची क्षमता त्या नाटकामध्ये आहे का? ते नाटक रंगमंचाच्या मर्यादांचा विचार करून लिहिले आहे का? केवळ कवीकल्पनेचा अविष्कार, किंवा रिअ‍ॅलिटीच्या नादी लागून हे नाटकात दिसले पाहिजे असा अट्टाहास करणे गैर आहे. रंगमंचावरील असलेल्या साधनांचा, सुविधांचा, काळ आणि वेळेच्या मर्यादांचा विचार करू न नाटक केले जाते. नाटकात एखादे दृश्य दाखवयाचे असेल तर ते वेगवेगळ्या शैलींचा वापर करून, तंत्राच्या मदतीने दाखवता येईल. यात सतत होणारा बदल हा प्रेक्षकांचा रसभंग करतो. कथा आणि नाटक यात मूलत: फ रक हाच आहे. कथेत अनेक लोकेशन्स शक्य आहेत. चित्रपटात त्या दाखवता येतात पण रंगमंचावर मात्र याला बंधन येते. हा झाला तंत्रयोजनेचा प्रश्न. एखाद्या नाटकाराचे नाटक वाचताना ते खूप आनंद देऊन जाते. पण तेच निर्मित करताना दिग्दर्शकाच्या क्रिएटीव्हीचा अंत पाहिला जातो. बरं एवढं करून ते रंगमंचावर उभे जरी राहिले ते नाटक म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे ही पुन्हा अग्नीपरीक्षा असते. प्रेक्षक नाटक पाहतात ते त्यातील नटांना प्रतीक समजून त्या नटाभोवती त्यांची नजर घुटमळत असते. त्यांच्याच खांद्यावर नाटकाचा डोलारा उभा असतो. खूप साहित्यिक जडबंबाळ भाषा, सतत दृश्यांचा बदल, प्रकाशात करावे लागणारे बदल अनेक प्रवेश किंवा दृश्ये ही सगळीच नाटकाच्या प्रवाही पणाला मारक ठरतात आणि मग या साठमारीत नाटकाचा मूळ अर्थ हरवला जातो.लेखकाच्या मनात पडलेली एखादी तीव्र संघर्षाची ठिणगी तिचे रूपांतर ते शब्दाद्वारे नाटकात असतो. त्या संघर्षमय ठिणगीचा अविष्कार हाच काय तो खरा त्या नाटकाचा आत्मा आहे. बाकी सगळं पूरक आहे. थोडक्यात, काय तर जे काही नाटककाराने साहित्य रुपात मांडले त्याचा सादरीकरणातून योग्य तो अविष्कार जर होत असेल तरच त्या सगळ्या प्रक्रियेची यशस्वीता आहे. अन्यथा नाटक पडले अशाच टीकेला त्या कलावंतांना धनी व्हावे लागते. या दोन्ही मूल्यात समतोल साधला तर त्या नाटकाचा रसपरिपोष होऊन प्रेक्षक आनंद सागरात डुंबत राहतील हा निर्मल विश्वास आहे.-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव