धावडे शिवारातील वाळूसाठा वैध की अवैध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:10+5:302021-06-02T04:14:10+5:30

नांदेड, ता. धरणगाव : नारणे येथील वाळूचा ठेका सुरू असताना अमळनेर तालुक्यातील धावडे शिवारात वाळूचा साठा करून ठेवण्यात आला ...

Valid or illegal sand storage in Dhavade Shivara? | धावडे शिवारातील वाळूसाठा वैध की अवैध?

धावडे शिवारातील वाळूसाठा वैध की अवैध?

नांदेड, ता. धरणगाव : नारणे येथील वाळूचा ठेका सुरू असताना अमळनेर तालुक्यातील धावडे शिवारात वाळूचा साठा करून ठेवण्यात आला आहे. हा वाळूसाठा वैध की अवैध याबाबतचे रहस्य मात्र गुलदस्त्यातच आहे.

धरणगाव तालुक्यातील नारणे येथील वाळूचा ठेका सुरू असताना नांदेड फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून एका शेतामध्ये शेकडो ब्रास वाळूचा साठा करून ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत नारणे येथील वाळूचा ठेका बंद झालेला आहे. हा वाळूसाठा अमळनेर तहसील कार्यक्षेत्राच्या सावखेडा तलाठी सजाच्या धावडे शिवाराअंर्तगत येतो. आजपावेतो हा वाळूसाठा ‘जैसे थे’ पडून होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने डंपरांद्वारे वाळूची वाहतूक केली जात असल्यामुळे हा वाळूसाठा वैध की अवैध? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा साठा वैध असेल तर रात्रीच्यावेळी वाळूची उचल का केली जात आहे? याबाबत सावखेडा भागाचे मंडळ अधिकारी गवळी यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा साठा वाळूच्या मक्तेदाराचा असून त्यांनी साठा करण्याबाबत परवानगी मागितली असता त्यांना रीतसर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रात्री वाळूची वाहतूक होत आहे, याबाबत विचारणा केली असता सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वाळू वाहतुकीस परवानगी असते. रात्री वाहतुकीस परवानगी नसते, असे मंडळ अधिकारी गवळी यांनी सांगितले.

===Photopath===

010621\01jal_7_01062021_12.jpg

===Caption===

सावखेडा तलाठी सजेतील धावडे शिवारातील हाच तो वाळूचा साठा व रात्रीच्या वेळी केली गेलेली वाळूची उचल.

Web Title: Valid or illegal sand storage in Dhavade Shivara?