वद वाढू कुणाला वरण गं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:10 PM2017-12-09T16:10:01+5:302017-12-09T16:16:59+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख ‘वद वाढू कुणाला वरण गं...’

Vada will grow somebody. | वद वाढू कुणाला वरण गं....

वद वाढू कुणाला वरण गं....

Next

बंडोपंत म्हणजे कट्टर सनातन जीव. एखाद्या निर्जीव गोष्टीत जरी बदल झाला तरी त्यांचा जीव खालीवर व्हायचा. ताटातल्या मिठाची जागा को¨शंबिरीने घेतली तरी त्यांच्या अंगाचा तिळपापड व्हायचा. मी स्वयंपाकघरात चहाच्या पातेल्यात चमचा ढवळत मजेत गात होतो, ‘गर्म भांडय़ातली शेव ही ùù’ तसे, पाठीमागे येऊन उभे राहिलेले बंडोपंत सात्विक संतापाने किंचाळले, ‘अहो, काय चाललंय काय हे?’ ‘बंडोपंत मी चहा करतोय. घेणार का, हे कशायपेय घोटभर?’ ‘ ते तुमच्यात घशात ओता. पण तुमच्या नरडय़ातून हे जे बाहेर पडतंय ते काय आहे?’ ‘ बंडोपंत, अहो नाटय़गीत गातोय, ‘ गर्म भांडय़ातली शेव हीùù.’ ‘जीभ कशी झडत नाही तुमची,मर्म बंधातली ठेव,तुम्ही गर्म भांडय़ात ओतलीत?’ ‘बंडोपंत, विडंबन आहे ते. आता हे बघा, ‘वद वाढू कुणाला वरण, करील जो पचन, कच्च्या डाळीचे, सखे गंùù मी धरील चरण त्याचे’. पाण्याचा ग्लास जवळ नसताना लाल-तांबडय़ा रश्शाचा कोल्हापुरी झटका बसावा तसा थयथयाट करत बंडोपंत किंचाळले, ‘तळपट होई तुमच्या प्रतिभेचे. अन्नाची चेष्टा? अन्नाची? कधी पेशवाई थाटाच्या भोजनावळीचं ‘पान’ पाहिलंय आयुष्यात?’ मी म्हटलं,‘ बंडोपंत छान आठवण करून दिलीत. अहो, त्यावर ‘रॅप’ गीतच आहे. ‘रॅप’ आणि मी गाऊ लागलो- काय वाढले पानावरती. ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे आले. आले लोणचे बहू मुरलेले आणि लिंबू रसरसलेले. किसून आवळे मधूर केले, कृष्णाकाठचे वांगे आणले. खमंग त्याचे भरीत केले, निरनिराळे चटके नटले. चटण्यांचेही बहू मासले, संमेलनची त्यांचे भरले. मिर्ची, खोबरे ती सव ओले, तीळ भाजुनी त्यात वाटले. कवठ गुणाचे मिलन झाले. पंचामृत त्या जवळी आले. वास तयांचे हवेत भरले. अंतरी अण्णा अधीर झाले. भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या, काही मोकळ्या. कोशींबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकडय़ा होत्या किसल्या मुळा कोवळा, मिरच्या ओल्या, केळी कापून चकत्या केल्या. चिरून पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या. रान कारली, वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी. चुका चाकवत मेथी कवळी. चंदन बटवा भेंडी कवळी. फणस कोवळा, हिरवी केळी. काजूगरांची गोडी न्यारी. दुधीभोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी. फेण्या पापडय़ा आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे. गवल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या. शेवायांच्या खिरी वाटल्या, आमटय़ांच्या मग वाटय़ा भरल्या. सार गोडसे रातांब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे. कणीदार बहू तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी. माङो रॅपगान चालू असतानाच बंडोपंतांचा चेहरा खुलत गेला. एकदोन वेळा ओठातून लाळही टपकली. न राहून ते म्हणाले, ‘अगदी पंक्तीत भोजनास बसल्यासारखं वाटलं बघा. पण हे असं अब्राrाणी रॅप वगैरे असायला नको होतं हो. भुजंगप्रयात किंवा मंदारमाला वृत्तात रचता आलं नसतं का? मनाचे लोक किंवा मंगलाष्टकं ऐकल्यासारखं पवित्र वाटलं असतं बघा.’ मी म्हटलं, ‘बंडोपंत ही रचना माझी नाही. मराठी भाषेचे महाकवी, गीत रामायणकार माडगुळकर अण्णांची आहे.’ हे ऐकून बंडोपंतांना लागलेला ठसका काही केल्या थांबतच नाहीये.

Web Title: Vada will grow somebody.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.