जळगाव जिल्ह्याच्या काही भागात बेमोसमी पाऊस, गणेशपूर येथे पडल्या गारा

By चुडामण.बोरसे | Published: February 26, 2024 10:47 PM2024-02-26T22:47:29+5:302024-02-26T22:47:44+5:30

जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारासचा प्रकार

Unseasonal rain in some parts of Jalgaon district, hail in Ganeshpur | जळगाव जिल्ह्याच्या काही भागात बेमोसमी पाऊस, गणेशपूर येथे पडल्या गारा

जळगाव जिल्ह्याच्या काही भागात बेमोसमी पाऊस, गणेशपूर येथे पडल्या गारा

चुडामण बोरसे, चाळीसगाव (जि. जळगाव): जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. गणेशपूर येथे गारा पडल्या आहेत. यामुळे मका, ज्वारी व बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील वरखेड, वाघडू, करगाव, अंधारी तसेच भडगाव तालुक्यातील जुवार्डी, आडळसे येथे वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Unseasonal rain in some parts of Jalgaon district, hail in Ganeshpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.