विनापरवानगी फलक, सहा जणांविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 12:36 IST2019-04-27T12:36:11+5:302019-04-27T12:36:45+5:30

आचारसंहिता भंग

Unprivileged panel, crime against six | विनापरवानगी फलक, सहा जणांविरूध्द गुन्हा

विनापरवानगी फलक, सहा जणांविरूध्द गुन्हा

जळगाव : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना विनापरवानगी वाढदिवसाचे फलक लावल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आचारसंहिता कक्षातील हाफीज उल्ला खान यांच्या पथकाला शुक्रवारी दुपारी आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराजवळ सुनील खडके यांच्या वाढदिवसाचा फलक आढळून आला़ याबाबात चौकशी केली असता विनापरवानगी हा फलक लावण्यात आल्याचे समोर आले़
अखेर याप्रकरणी आचारसंहिता भंग व शहर विद्रुपीकरण कायद्यानुसार संशयित चंद्रकांत बेंडाळे, किशोर ढाके, अरूण बोरोले, नितीन इंगळे, कंवरलाल संघवी, चंदन महाजन यांच्याविरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पुढील तपास शिवाजी पवार हे करीत आहेत़

Web Title: Unprivileged panel, crime against six

टॅग्स :Jalgaonजळगाव