प्रभू श्रीरामांचा जयघोष, अयोध्येतील मंदिर भूमीपूजनानिमित्त जळगावात अपूर्व उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:35 IST2020-08-05T12:32:26+5:302020-08-05T12:35:16+5:30
विविध कार्यक्रम

प्रभू श्रीरामांचा जयघोष, अयोध्येतील मंदिर भूमीपूजनानिमित्त जळगावात अपूर्व उत्साह
जळगाव : अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातही उत्साहाचे वातावरण असून बुधवारी सकाळपासून ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहे.
यामध्ये जी.एम. फाउंडेशन कोविड केअर सेंटर येथे प्रभू श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. रामरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोबतच काही रामभक्तांनी श्रीरामांच्या भव्य प्रतिमेसमोर नमन केले.
शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत असून मंदिर सजले आहेत.