किनगाव, ता. यावल : जिल्हा परिषदेच्या किनगाव-डांभुर्णी गटात असंघटित कामगारांचे ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी अभियान शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी असंघटित कामगारांसाठी म्हणजेच काम करणारे लहान शेतकरी/ शेतमजूर, पशुपालन करणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, लेदर कामगार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षाचालक, घरकाम करणारे कामगार, आशा कामगार, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्रचालक, स्थलांतरित कामगार, भाजीपाला विक्री करणारे यासारखे असे अनेक लोक आहेत. त्यांची शासनाकडे नोंद नाही. अशांची नोंदणी होईल. त्यांचे इ श्रम कार्ड देणार आहे.
यावल तालुक्यातील गिरडगाव व वाघोदा येथे नागरिकांच्या सोयीसाठी गिरडगाव ग्रामपंचायतीमार्फत १८ व १९ सप्टेंबर रोजी शिबिर आयोजित केले आहे. नाव नोंदणीसाठी किनगाव येथे दिलीप चौधरी यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.