गरोदर पत्नीवर अनैसर्गिक कृत्य; तर सासऱ्याकडून वाईट स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:07+5:302021-09-02T04:37:07+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ठाणे जिल्ह्यातील असून, तिचे सासर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. ३ जुलै २०१७ पासून ते ...

गरोदर पत्नीवर अनैसर्गिक कृत्य; तर सासऱ्याकडून वाईट स्पर्श
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ठाणे जिल्ह्यातील असून, तिचे सासर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. ३ जुलै २०१७ पासून ते ३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पती, सासू, सासरे व दीर यांनी विवाहितेचा किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला. लग्नात सोन्याचे दागिने, पैसे व इतर वस्तू कमी दिल्याचे कारण सांगून छळ केला, तर सासरा सतत वाईट हेतूने अंगाला स्पर्श करीत होता. पतीने तर कहरच केला. गरोदर असताना शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. त्यातही अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, या कृत्याची कुठे वाच्यता केली तर पोटातील बाळालाच मारून टाकण्याची धमकी या चौकडीने दिली. त्रास असह्य झाल्याने पीडितेने ठाणे जिल्ह्यातील कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तेथून शून्य क्रमांकाने हा गुन्हा बुधवारी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाला. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.